Search
Close this search box.

लग्न केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; पाच जणांवर गुन्हा दाखल

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : लग्न करण्यासाठी बळजबरी करुन लग्न केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली. याला घाबरून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली होती. ही घटना २१ मे २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान साठे वस्ती येथे घडली होती. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर (वय २० वर्षे, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विजया ज्ञानेश्वर काळभोर (वय-४८ वर्षे, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निकीता अशोक ससाणे, शुभम रवी ससाणे, स्वयंम रवी ससाणे, अशोक देवराम ससाणे आणि एक महिला (सर्व रा. तारासिटी समोर, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांच्यावर भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा मुलगा सुदर्शन काळभोर याला लग्न करण्यासाठी बळजबरी केली. लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपींनी दिली. आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फौजदारी न्यायालय क्रमांक ७ एस.जी. बरडे यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने ११ जुलै रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) प्रमाणे तपास करुन त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास लोणी काळभोर पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक : नितीन मधुकर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool