Search
Close this search box.

पोलिसांचा चोरट्यांवर गोळीबार, वंडरसिटी परिसरातील घटना

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामाऱ्या असे प्रकार वाढत असताना काही चोरट्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी पोलिसांनी चोरट्यांवर गोळीबार केला. हा प्रकार शहरातील नवले पुलाजवळ वंडरसिटी, कात्रज परिसरात मध्यरात्री घडला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी आणि त्याचे सहकारी रविवारी मध्यरात्री नवले पूल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी वंडसिटी भागात दोघेजण मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच दोघे तरुण कारमधून पळून जात होते. पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोळी यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर चोरटे नवले पुलाच्या दिशेने पसार झाले. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्य संपादक : नितीन मधुकर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool