पीएमपीएल कार्यालय स्वारगेट या ठिकाणी लहुजी शक्ती सेना च्या वतीने लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अप्पर येथील बस डेपोला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांचे नाव देण्यात आले त्यामुळे पीएमपीएल चे सर्व व्यवस्थापक संचालक नितीन नार्वेकर साहेब यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पेढे भरवण्यात आले व त्यांचे लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी लहू सत्ताचे मुख्य संपादक दादासाहेब कसबे लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नितीन भाऊ वायदंडे लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे युवकाध्यक्ष दत्ताभाऊ दडे त्याचबरोबर लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहराध्यक्ष यमराज भाऊ खरात पुणे शहराचे उपाध्यक्ष तिरुपती भाऊ कसबे पुणे शहराचे कार्याध्यक्ष संकेत भाऊ शिंदे पुणे शहर माथाडी आघाडीचे अध्यक्ष तेजस भाऊ बल्लाळ पुणे शहर कोर कमिटीचे अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण लहुजी शक्ती सेना मीडिया प्रमुख अनिकेत भाऊ हजारे व लहूसैनिक उपस्थित होते