Search
Close this search box.

पिंपरी चिंचवडच्या घरकुल मधील बहुउद्देशीय सभागृहाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे, आयुक्त मा, शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल परिसरातील सर्वात मोठा बहुउद्देशीय सभागृहाला साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर आण्णाभाऊ साठे सभागृह नाव देण्यात यावे अशी मागणी आज परिसरातील रहिवासी नागरिकांनी केली विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ,लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहर ,भ्रष्टाचार निर्मूलन समिती, तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ, कीर्ती मारुती जाधव यांच्या वतीने ही मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा, शेखर सिंह, भोसरी विधानसभेचे आमदार मा, महेश दादा लांडगे व विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा, अमित गोरखे यांच्याकडे करण्यात आली आहे,
सौ ,कीर्ती जाधव यांनी विनंती केली की, वर्षानुवर्ष चाललेला सभागृहाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून त्यांचे नामकरण साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह असे करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे,
निवेदन देण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते , मारुती जाधव लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष लहू राम आडसूळ, कार्याध्यक्ष शंकर भाऊ खवळे, सोमनाथ कांबळे भीमशक्ती नगर विभाग प्रमुख, दीपक मोतेवाड,इ, मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool