Search
Close this search box.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली विनंती शेतकऱ्यांना डेअऱ्यांकडून मिळणाऱ्या दरांमध्ये घट होणार नाही याची हमी द्यावी. जेणेकरून येथील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार कडे केली विनंती
भारत सरकारने सूर्यफूल तेल, मका, मोहरीचे तेल, दूध पावडर आयात करण्यास परवानगी दिली आहे. टिआरक्यू अंतर्गत ही आयात केली जात असून यानुसार कमीत कमी आयात शुल्क लादले जाणार आहे. सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाची आयात गैरवाजवी असल्याचा सूर उमटत असतानाच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दूध पावडरीच्या आयातीचा फटका बसू शकतो.
सध्या मूळातच दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरीकडून मिळणारे सध्याचे भाव परवडत नाहीत. त्यात आयातीच्या या नव्या संकटामुळे डेअरीकडून मिळणारे दूधाचे दर आणखी कमी होऊ शकतात.म्हणूनच केंद्र सरकारला विनंती आहे की, ही आयात करीत असताना आपण शेतकऱ्यांना डेअऱ्यांकडून मिळणाऱ्या दरांमध्ये घट होणार नाही याची हमी द्यावी. जेणेकरून येथील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool