Search
Close this search box.

वडगाव धायरी मध्ये तरुणीचा पाठलाग करुन ब्लेडने वार करण्याची धमकी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : तरुणीने नकार दिला असताना देखील तिचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला रस्त्यात अडवून जबरदस्तीने अंधारात नेऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तु माझ्याशी लग्न केले नाही तर ब्लेडने वार करीन अशी धमकी दिली. हा प्रकार धायरी परिसरात जुन २०२४ ते १९ जुलै २०२४ या कालावधीत वारंवार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत १८ वर्षीय पीडित तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिपक प्रकाश गायकवाड (रा. गल्ली नं. ९०, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याच्यावर भा. न्या. सं. कलम ७४, ७५, ७८, ११५, ३५२, ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत होता. तरुणीने त्याला माझा पाठलाग करु नको असे सांगितले तरी देखील तो तिचा पाठलाग करत होता. पीडित तरुणी धायरी येथील रोडवरुन जात असताना आरोपीने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला. त्याने त्याची दुचाकी आडवी लावून तीची वाट आडवली. याबाबत मुलीच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने तरुणीच्या आईसोबत उद्धट बोलला. त्यानंतर धायरी परिसरातील एका मंदिराजवळ दुचाकी आडवी लावून मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिला. आरोपीने तिचा हात पकडून एका अंधाऱ्या ठिकाणी जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तसेच तु माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तु माझी नाही झाली तर मी कोणाचीच होऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच मुलीचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक : नितीन मधुकर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool