Search
Close this search box.

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची कोल्हापूर तुरुंगात निर्घूण हत्या,

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईसाठी 12 मार्च 1993 हा काळा दिवस होता, या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 जखमी झाले होते.
मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची कोल्हापूरमधील कारागृहामध्ये निर्घूण हत्या करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भंवरलाल गुप्ता याची डोकं फोडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पाच जणांनी मिळून मोहम्मद अली खानचा खून केला.
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटामधील चार आरोपींनी कोल्हापूर कारागृहात ठेवण्यात आलं आहे. यामधील मोहम्मद अली खान यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले पाच जण एकाच तुरूंगात होते. पाच जणांनी मोहम्मद अली खान याचं डोकं फोडत त्याला संपवलं. प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी याबाबत माहिती दिली.
या खूनामागचा त्यांचा हेतू काय होता? एकाच तुरूंगात असताना त्यांच्यात काही वाद झालेला का? याचा तपास आता पोलीस करत असल्याचं स्वाती साठे यांनी सांगितलं. पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कोल्हापूर कारागृहात मृत आरोपी मोहम्मद अली खान उर्फ मुन्ना उर्फ मनोज कुमार भंवरलाल गुप्ता जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool