*🌏🌾लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कु.प्रिती हजारे यांचा पालकांसह माटेफळ मध्ये सत्कार 🌏🌾*
मुरुड :- लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश मेडीया प्रमुख मा.अनिकेत हजारे यांच्या कनिष्ठ भगीनी कु.प्रिती बाळासाहेब हजारे यांनी राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कु.प्रिती बाळासाहेब हजारे यांचा पालकांसह नुकताच सत्कार करण्यात आला.<a href="https://maharashtrafastdigitalnews.in/wp-content/uploads/2024/11/IMG_202
🔹मुरूड शहरापासून जवळच असलेल्या मौजे माटेफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास पुणे येथील पब्लीक रिलेशन ऑफीसर मा.श्री. संतोष उपाडे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती तर लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते मा.प्रा.दयानंद कांबळे संतोष उदारे बापुराव खोसे बालाजी गुटुलकर प्रताप खोसे चंद्रकांत हजारे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
🔹 यावेळी बोलताना सत्कारमुर्ती कु.प्रिती हजारे म्हणाल्या की स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते आणि ती जिंकलीच पाहीजे यासाठी मी निर्धार केला व मैदानात उतरले तेंव्हा राज्यातून आलेल्या ३६ जिल्ह्यातील खेळाडूंचा मला सामना करावा लागला परंतु माझ्या गुरुंनी मला दिलेली विद्या याकामी उपयोगी पडली म्हणूनच मी हे दैदिप्यमान यश मिळवू शकले त्यामुळे या यशाचं श्रेय आईवडीलांना व बालाजी गुरुलकर सर व बापुराव खोसे सरांना देते.
🔹 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालनाची धुरा दत्ता हजारे यांनी सांभाळली तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार बाळासाहेब हजारे यांनी मानले.
🔸 यावेळी या कार्यक्रमाला मोनिका हजारे बीभीषण घोडके बालाजी हजारे आनंद हजारे शंकर हजारे रानबा हजारे बापु हजारे बबलू हजारे कडूबाई हजारे अनीता हजारे अज्ञान हजारे शालू हजारे मिरा हजारे विमल हजारे आदी सह समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹🔹🔸🔸🔹🔹🔸🔸🔹🔸
