Search
Close this search box.

खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड लंपास; लष्कर भागातील घटना

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती हायलँडस, महंमदवाडी, हडपसर) यांनी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी पटेल हे एक व्यावसायिक असून लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका सोसायटीत त्यांचे कार्यालय आहे. कार्यालयीन कामासाठी त्यांनी साडेपाच लाख रुपयांची रोकड ठेवली होती. कार्यालयातील खिडकीची काच सरकवून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी कप्पा उचकटून चोरट्याने रोकड घेतली. त्यानंतर तो तिथून पसार झाला. सोमवारी दुपारी रोकड चोरीला गेल्याचा प्रकार पटेल यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, चोरट्याला कार्यालयाची माहिती असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.