Search
Close this search box.

घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा अटक; शहरात ठिकठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : परराज्यातून दुचाकीवरून येऊन घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वारजे माळवाडी भागात घरफोडी करुन हा चोरटा पसार झाला होता. त्याच्याकडून एका दुचाकीसह कटावणी, कटर, पाना असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यंकी हा परराज्यातून दुचाकीवर येत असे. त्यानंतर तो शहरात घरफोडीचे गुन्हे करत असे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना आरोपी व्यंकी याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या तपास पथकाने कर्वेनगर भागात सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतले. व्यंकीकडून दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकीची डिकी पोलिसांनी उघडली. दुचाकीच्या डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर सापडले. पोलिसांनी व्यंकी याची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत व्यंकीने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे. सदर कामगिरी हि परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी केली आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.