<a *भाजपाच्या 99 उमेदवाराच्या पहिल्या यादीमध्ये मातंग समाजाला डावलले..? विष्णूभाऊ कसबे मुंबई येथे फडणवीसांच्या भेटीला..!*
मुंबई येथील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांची महत्त्वाची बैठक संपन्न,दुसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी यादीत जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचा फडवणीस यांचा शब्द…!
राज्याचे उपमुख्यमंत्री आदरनिय श्री.देवेंद्रजी फडवणीस साहेब व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णूभाऊ कसबे साहेब यांची मुंबईत सागर बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यामध्ये,अर्धा तास झालेल्या या बैठकीमध्ये,भारतीय जनता पार्टीने पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत त्यामध्ये चार अनुसूचित जाती उमेदवारांचा देखील सहभाग आहे परंतु या चारही उमेदवारांमध्ये मातंग समाजाला डावलण्यात आलेले असून या संदर्भात विष्णूभाऊ कसबे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे तसेच उर्वरित दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये मातंग समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व व समाजातील काही नेत्यांची उमेदवारी साठी शिफारसचे लेखी पत्राद्वारे आदरणीय फडवणीस साहेब यांच्या कडे केली आहे यावेळी दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये जास्तीत जास्त मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल असे ठोस आश्वासन फडवणीस साहेब यांनी यावेळी दिले आहे. या बैठकीस लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड,प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अमोलभाऊ चव्हाण,राज्य कार्यकारिणी सदस्य आशिषभाऊ कसबे,बाळुभाऊ जाधव, सहसचिव नितीन वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष नितीन दोडके,श्रावण बनसोडे,#अनिकेत हजारे,अमोल कांबळे,राहुल वाघमारे,एकनाथभाऊ साबळे,अभय नार्वेकर, रमिझ सय्यद आदी उपस्थित होते.
