Search
Close this search box.

अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह, मुलगी गर्भवती; मुलीच्या पतीसह सासू, आई-वडिलांविरुद्ध गुन्हा

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन युवती असताना तिचा बळजबरीने विवाह केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन विवाहित मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती, सासू, आई, वडिलांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीने विवाह करण्यासाठी विरोध केला होता. पती, सासू, आई तसेच वडिल यांना युवती ही अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरी देखील युवतीच्या मनाविरुद्ध गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा बळजबरीने एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर युवतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. विवाहानंतर काही दिवसातच मुलगी गर्भवती झाली. वैद्यकीय तपासणीमध्ये ही बाब उघड झाली. दरम्यान, इच्छा नसताना देखील अल्पवयीन युवतींना धमकावून, तसेच बळजबरी करुन त्यांचे विवाह करण्यात येत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. अशा प्रकरणात तक्रारदार युवतींच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची तसेच नाजूक असते. हलाखीच्या परिस्थितीमुळे युवतींचे बळजबरीने विवाह लावून दिले जाते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेदगुडे करीत आहेत

Tejas Ballal
Author: Tejas Ballal

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.