Search
Close this search box.

दारुच्या नशेत वेडीवाकडी गाडी चालवून महिला पोलिसांना केली धक्काबुक्की; पोलिसांना घरी बसविण्याची दिली धमकी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : दारुच्या नशेत वेडीवाकडी कार चालवित असलेल्या तरुणाला पोलिसांनी थांबविले. त्यावर महिला पोलिसांना धक्काबुक्की करीत त्या तरुणाने धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे. या दारुड्याने मोठ्या लोकांची नावे सांगून तुम्हा सगळ्यांना घरी बसवितो, अशी पोलिसांना धमकी दिली. याबाबत पोलीस हवालदार दिपमाला नायर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शशांक अवध त्रिपाठी (वय ३६ रा. मार्वेल गंगा, वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नायडु हॉस्पिटल लेन, आरटीओ चौकाच्या अलीकडे शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी नाकाबंदी करत होत्या. त्यावेळी सेल्टॉस कारवरील चालक याने वाहन दारु पिऊन वेडीवाकडी चालवत होता.
फिर्यादी यांनी त्याला थांबविले. त्याची टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करुन ”तुमको घर पे बैठाऊंगा, कल बताता हुं, मै कौन हुं,” असे जोरजोरात ओरडून फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करीत आहेत.
Tejas Ballal
Author: Tejas Ballal

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.