<a अनुसूचित जातीमधील उपेक्षित वंचित जात समूहांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासननिर्णय प्रसिद्ध झाला असून अध्यक्षस्थानी मा.न्यायमूती श्री.अनंत मनोहर बदर निवृत्त न्यायाधीश, मा.उच्च न्यायालय पाटणा व सदस्य सचिव म्हणून श्रीमती इंदिरा आस्वार निबंधक डॉ.बाबासाहेबआंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे. यांची नियुक्ती करण्यात आली आहे आयोगाची स्थापना महाराष्ट्र सरकारने कालच्या कॅबिनेटमध्ये केलेली असून त्याचा शासन निर्णय आज आलेला आहे, या ऐतिहासिक लढ्याला यश आल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रभर ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून पेढे भरवून राज्यभर सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत करा बांधवांनो…
महाराष्ट्राच्या हजारो किलोमीटर च्या रोडवर माझ्या विष्णु भाऊंच्या पायाचे रक्त सांडले आहे तेव्हा हा लढा यशस्वी झालाय…!
या लढ्यास ताकद देणारे विविध संघटनाचे संघटना प्रमुख,ज्ञात-अज्ञात समाज बांधव,भगिनी.. तसेच विविध पक्षात राजकीय पदावर काम करणारे समाज बांधव या सर्वांच्या पाठबळामुळे हे सर्व शक्य झाले आहे…
न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणा संदर्भात आयोगाची स्थापना झाल्याबद्दल आज पत्रकार भवन येथे #लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे साहेब यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.💛✌️🚨*
