Search
Close this search box.

खेळत असलेल्या मतीमंद मुलीला उचलून नेत बलात्कार; शारीरिक संबंधांचे व्हिडिओही काढले

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या गतीमंद मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने गतिमंद मुलीला चॉकलेट खाण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत बलात्कार केला आहे. या घटनेने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार हडपसरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राजनाथ (वय-३७) नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (आय) (के) (एम), ६५ (१), ३५१ (२) सह कलम ४, ५ (के) (एल), ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलगी ही गतीमंद आहे. ती घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला खाऊसाठी पैसे देतो असे सांगत उचलून सोसायटीमधील एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ चित्रीकरण करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.