Search
Close this search box.

बहिणीला पळवून नेण्याची धमकी दिल्याने तरुणाचा खून; पुण्यातील घटनेची खळबळ

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

पुणे : पुण्यातील दांडेकर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एकाला बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात सोमवारी (दि. १४) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. कौस्तुभ जयदीप नाईक (वय-२९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. बहिणीला पळवून नेण्याची धमकी त्याने आरोपीला दिली होती. या कारणावरुन आरोपीने कौस्तुभला सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल भागात बोलावून घेतले. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कौस्तुभला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत कौस्तुभ गंभीर जखमी झाला. तातडीने कौस्तुभला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, शहरात गेल्या दोन दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. हडपसर येथे आर्थिक वादातून एका तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह हिंगणे मळा परिसरातील कालव्याजवळ टाकून दिला होता. चारित्र्याच्या संशयातून रविवारी मध्यरात्री महिलेच्या डोक्यात सिलिंडरची टाकी घालून खून केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली होती. त्यानंतर आता सोमवारी सायंकाळी दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.