a>
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका मद्यपी दुचाकी चालकाने कारच्या काचेवर दगड मारून काच फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील फिल गार्ड कंपनी समोर सोमवारी ( दि. १४) साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पंकज ब्रम्हे असे नुकसान झालेल्या गाडीच्या मालकाचे नाव आहे. तर बंटी असे गाडी फोडणाऱ्या मद्यपी दुचाकी चालकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने गाडीच्या पाठीमागच्या सीटवर कोणी न बसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
