Search
Close this search box.

स्पीकरच्या आवाजावरुन दोन ग्रुप एकमेकांविरोधात भिडले; लाकडी बांबु, तलवारीने केली मारहाण

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्पीकरच्या आवाजावरुन दोन गट एकमेकांविरोधात भिडले; लाकडी बांबु, तलवारीने केली मारहाण
ऑक्टोबर १४, २०२४

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंडळाच्या स्पीकरच्या आवाजावरुन झालेल्या वादात दोन गट परस्पराविरोधात भिडले आहेत. एकमेकांना लाकडी बांबु, तसेच तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नटराज मित्र मंडळाच्या शेजारी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून फिर्यादी देण्यात आल्या आहेत. पहिली फिर्याद आशिष विजय तारु (वय-३२, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद बाळासाहेब आगणे (वय-४३, रा. नटराज मित्र मंडळाशेजारी, कसबा पेठ) याला अटक करण्यात आली आहे. तारू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मित्र तेजस राऊत हा मंडळातील देवीजवळ प्रसाद वाटत होता. त्यावेळी प्रमोद आगणे याने तू बाहेरून येऊन जास्त शहाणपणा करतोस, असे म्हणून माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तेजसच्या कानाखाली मारली. त्यानंतर मंडळाच्या इतर लोकांनी त्यास तू शिव्या का देतो, असे म्हणाले. दरम्यान, त्यावेळी प्रमोद हा त्याच्या घरात गेला. आणि घरातून तलवार घेऊन बाहेर आला. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या गर्दीत घुसण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या हातातून तलवार काढून घेत असताना फिर्यादी यांच्या हाताच्या बोटाला तलवार मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तर दुसरी फिर्याद वनिता प्रमोद आगणे (वय-३५, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आशिष तारु, निलेश देसाई (वय-३८), अक्षय तारु (सर्व रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता आगणे यांनी दिलेल्या आगणे फिर्यादीनुसार, वनिता यांच्या घराजवळ नटराज मित्र मंडळाचा नवरात्र महोत्सव सुरु होता. मंडळाने मोठया आवाजात साऊंड सिस्टिम लावली होती. फिर्यादी यांचे पती प्रमोद आगणे यांनी मंडळांच्या व्यक्तींना आवाज कमी करा असे सांगितले. त्याचाच राग मनात धरुन ललित भोकरे याने प्रमोद आगणे यांना शिवीगाळ केली. निलेश देसाई याने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. आशिष तारु, निलेश आणि बाबु तारु यांनी प्रमोद यांच्या डोक्यात लाकडी बांबुने मारहाण केली. इतर लोकांनी देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.