पुणे : महिलांवरील अत्याचार, कोयता गॅंग, लुटीचे प्रकार आणि सायबर क्राइम अशा अनेक घटना मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुण्यातील एका महिलेला सोशल मिडियावरील ओळख महागात पडली आहे. महिलेशी मैत्रीचे नाटक करत महिलेला तब्बल १२ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सोशल मिडीयातून अनोळख निर्माण केल्यानंतर मैत्रीचे नाटक करत सायबर चोरट्यांनी महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने १२ लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी कात्रजमधील ३९ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईलधारक व इन्स्टाधारक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे इन्स्टावर खाते आहे. त्यावरून आरोपींनी महिलेशी ओळख केली. ओळखीनंतर मैत्री निर्माण केली. नंतर चोरट्याने परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले. परदेशातून भेटवस्तू पाठवितो, असे आमिष महिलेला दाखविले. त्यांच्यात बोलणे सुरू होते. तेव्हा परदेशातून भेटवस्तू पाठविले आहे. पण, ते विमानतळ सीमाशुल्क विभागाने पकडले आहे. ती भेटवस्तू सोडविण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. विश्वासाने महिलेने संबंधिताने दिलेल्या एका बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ९५ हजार रुपये जमा केले. परंतु, तरीही पैसे जमा करण्यास सांगण्यात येत असल्याने महिलेला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.
