पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तरुण लोणीकंद भागात राहायला आहे. तरुणाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून मॅसेज पाठवत शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत माहिती पाठविली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला तरुणाला परतावा देत त्याचा विश्वास संपादन केला. मात्र, नंतर त्याला नफा किंवा गुंतवणूक रक्कम न देता फसविले. वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजीतवाड पुढील तपास करत आहेत
