<केसनंद-थेऊर रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
ऑक्टोबर ०५, २०२४
पुणे : केसनंद (ता.हवेली) येथे ऑप्टिमा हाइट्स सोसायटी समोर, केसनंद-थेऊर रस्त्यावर ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८.४० च्या सुमारास दुचाकी व टेम्पो यांचा अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अजय प्रताप सूर्यवंशी (वय ३२, रा. सोने माळ वस्ती,साष्टे, ता. हवेली जि. पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय सूर्यवंशी हा दि. ३ रोजी सायंकाळी ८.४० सुमारास केसनंदकडून कोलवडीकडे जात असताना त्याच्याकडील स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम.एच. १२ एम.वाय. ०१६५ या दुचाकीस ११०९ टेम्पो क्रमांक एम.एच. १२ एच.डी. ०५१८ हा टेम्पो चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अजय सूर्यवंशी यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्याच्या डोक्यास किरकोळ व गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला. निष्काळजीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत असलेला ड्रायव्हर गणेश तुकाराम शिंदे (वय २५ वर्ष, रा. चव्हाण कॉम्प्लेक्स शिक्रापूर, मुळगाव राहणार- टाकळी लोणार, ता.श्रीगोंदा, जिल्हा. अहमदनगर) याच्या विरोधात मयत यांचा मेव्हणा किरण अशोक कांबळे वय ३५ वर्षे, राहणार भोर वस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेलीयांनी फिर्याद दिली असून ड्रायव्हर वरती लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी गणेश तुकाराम शिंदे अपघात झाल्यानंतर तत्काळ अटक केली असून त्याचे टेम्पो वाहन अधिकृतपणे जप्त केले आहे. पुढील तपास करीत असून अपघातातील मयताच्या कुटुंबाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
– शिरीष भालेराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक,लोणीकंद पोलिस स्टेशन.
