Search
Close this search box.

अट्टल गुन्हेगार अटकेत : गुन्हेशाखा युनिट ६ ची कारवाई

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : वेगवेगळ्या राज्यात ९० पेक्षा अधिक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला वाघोली परिसरातून गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी (ता. ०५) सायंकाळी हि कारवाई करण्यात आलेली आहे. अच्युत सोमांना कुमार (वय ३४ वर्षे, रा. कोळीवाड जि. धारावाड हुबळी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरीचे एकूण ९० गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नेचींग प्रतिबंध करत असताना चैतन्य पुरी पोलीस स्टेशन (रजकोंडा, हैद्राबाद) येथील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता. सदर गुन्ह्याचे तपास कामी हैदराबाद पोलीस यांचे टीमसह गुन्हे शाखा युनिट तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणानुसार अज्ञात चोरट्याची माहिती घेतली. त्यानुसार अच्युत कुमार हा चोरटा हा वाघोली परीसरातील चोखीधानी रोड वरील बजाज शोरूम जवळ असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्यानुसार सदर चोरट्यास मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अच्युत कुमार असल्याचे सांगीतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीवर वेगवेगळ्या राज्यात जबरी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्यावर एकूण ९० गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पुढील कारवाई कामी वारिष्ठांचे आदेशाने चैतन्य पुरी पोलीस स्टेशन (रजकोंडा हैद्राबाद) पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस अमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे, सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.<a

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.