Search
Close this search box.

पुणे महानगरपालिका आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांना केले निलंबीत

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य शासनानेच महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी नेमलेले डॉ. भगवान पवार यांना शासनानेच निलंबीत केले. विशेष असे की, अवघ्या सहा ते सात महिन्यांपुर्वी पुणे महापालिकेत नियुक्ती झाल्यानंतर पुणे महानगरपालिका येथे कुठलेही गंभीर आरोप झाले नसताना त्यांना निलंबीत केले आहे
परंतू यानंतर मात्र सातत्याने डॉ. पवार यांनी राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात आणि विभागात काम केले होते, त्याठिकाणची त्यांच्या विरोधात माहिती गोळा करण्याचे काम काही मंडळींनी हाती घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल शिक्षा व अन्य कारवाई झाल्याबद्दलच्या प्रकरणांचा समावेश होता. यासाठी नेमलेल्या पथकाने तयार केलेला अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये सातारा येथे आरोग्य अधिकारी असताना एका महिला कर्मचार्‍याने केलेल्या लैंगिक शोषणाची तक्रार तसेच आरोग्य खात्याच्या साहित्य खरेदी प्रकरणातील गैरव्यवहाराबाबत चौकशीचा अहवाल जोडण्यात आला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. पवार यांच्या निलंबनाबाबत विचारणा केली असता महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले,
की डॉ. पवार हे राज्य शासनाच्या सेवेत होते. त्यामुळे डॉ. पवार यांच्या संदर्भातील सर्व निर्णय राज्य शासनाच्या
अख्त्यारीत येतात. राज्य शासनाने डॉ. पवार यांच्या निलंबनाची नोटीस माहीतीसाठी महापालिकेला पाठविली आहे.

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool