पुणे पोलीस आयुक्तालय येथे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज काही वेळापूर्वी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये पुण्याचे अपर पोलीस आयुक्त, सर्व झोनचे पोलीस उपायुक्त उपस्थित होते. पुणे शहरातील परिस्थिती तसचं झालेल्या अपघाताच्या बाबत पोलीस आयुक्त यांची बैठक संपन्न झाली. आज झालेल्या कोर्टच्या सुनावणीनंतर आयुक्तांनी रीतसर सर्व आढावा घेतला. बैठकीला अपघात प्रकरणाचे सर्व तपास अधिकारी देखील उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान पुणे पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी येरवडा पोलीस स्टेशन मधील २ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशा दोघांना निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.

