<पुणे, 23 मार्च 2025 – शहिद दिनाच्या निमित्ताने बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्थेने यंदाही एक महत्त्वाची सामाजिक कार्ये पार पडले. संस्थेच्या वतीने गोरगरीब कष्टकरी, हमाल आणि टेम्पो चालक यांना कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळी कॅप वाटप केले.
हे वाटप क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौक, टिंबर मार्केट, पुणे येथील सर्व कष्टकऱ्यांसाठी करण्यात आले. या उपक्रमात बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्थेचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे रवी आप्पा पाटोळे म्हणाले, "गोरगरीब कामगारांसाठी हे छोटेसे योगदान त्यांना उन्हाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून थोडेफार आराम देईल. आम्ही दरवर्षी अशा प्रकारे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतो
या उपक्रमामुळे स्थानिक कष्टकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
हे वाटप संस्थेच्या सामाजिक कार्यांतील एक महत्त्वाचा भाग आहे आणि यामुळे समुदायातील विविध घटकांना मदतीचा हात देण्यात येत येईल
