मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
वंचित उपेक्षित समाज घटकासह मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यात लहुजी शक्ती सेनेचे कार्य मोठे आहे लहुजी शक्ती सेना समाजमान्य संघटना असून महायुती सोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे मातंग समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतलेली आहे असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे यांच्या भेटीदरम्यान मुंबई येथे काढले आहेत.
सदरची भेट आज दिनांक 18 मार्च रोजी विधान भवन मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालय येथे झाली आहे.
यावेळी लहुजी शक्ती सेना आयोजित पुणे येथे झालेल्या मातंग समाज महाअधिवेशन संदर्भासाठी फोटो व चित्रफीत तसेच घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण ठरावाचा दस्त यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे सादर करण्यात आला.
