Search
Close this search box.

टीप कमी झाल्याने वेटरने वेटरच्या डोक्यात कुंडी मारुन केली मारहाण

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

पुणे : हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असताना त्याला चांगली टीप मिळत असे. परंतु, नवा वेटर आल्याने टीपचे पैसे कमी मिळत असल्याच्या रागातून त्याने हॉटेल बाहेर ठेवलेली कुंडी डोक्यात घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. याबाबत राकेश प्रकाश लोखंडे (वय ३४, रा. सदगुरु दर्शन, आंबेगाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण थापा (वय २२, रा. दबडे चाळ, विश्वराज हॉस्पिटलजवळ, लोणी काळभोर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नर्‍हे येथील हॉटेल झणझणीत येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही हॉटेल झणझणीत येथे काम करतात. फिर्यादी हे हॉटेलमध्ये काम करत असताना लक्ष्मण थापा या वेटरला वाटू लागले की, राकेश लोखंडे याच्या मुळे त्याला मिळत असलेल्या टिपचे पैसे कमी मिळत आहेत. या रागातून त्याने राकेश यांना तू येथे काम करु नको, तू येथून निघून जा, नाहीतर तुला बघून घेईल, अशी धमकी दिली. त्यांना शिवीगाळ केली. हॉटेलच्या बाहेर ठेवलेली कुंडी राकेश यांच्या डोक्यात मारुन व तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार मोरे अधिक तपास करीत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.