<a
पुणे : सुरक्षा रक्षकांच्या टेबलमध्ये विसरलेली चावी घेऊन एका तरुणाने सदनिकेतून ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना वाघोलीतील साईमंगल अपार्टमेंट येथे घडली. या प्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद चेडे (वय २८, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राहुल राठोड (वय ३०, रा. वाघोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, राठोड हा चेडे यांच्या ओळखीचा आहे. चेडे यांच्याकडून त्यांच्या सदनिकेची चावी सुरक्षा रक्षकाच्या टेबलमध्ये विसरली होती. त्याच संधीचा फायदा घेत राठोड याने चावी घेऊन चेडे यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून दागिन्यांची चोरी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.