<a hre
आळंदी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलिस ठाण्याच्या वतीने आळंदी शहर, इंद्रायणी घाट आणि मरकळ ग्रामपंचायत हद्दीसह औद्योगिक भागात पथसंचलन करण्यात आले. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आळंदी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांनी केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आळंदीसह विविध गावांमध्ये, झोपडपट्टी परिसरात पथसंचलन केले. यात आळंदी शहरात सकाळी पोलिस ठाणे, नगर परिषद चौक, महाद्वार चौक, पितळी गणपती मंदिर, घुंडरे आळी चौक, चाकण चौक, केळगाव चौक, वडगाव चौक, पद्मावती झोपडपट्टी, मरकळ चौक, जलाराम मंदिर चौक, दत्तमंदिर, विठ्ठल-रुक्मिणी चौक अशा मार्गाने पथसंचलन केले. तर मरकळ गावात मुख्य प्रवेशद्वाराजवळील मारुती मंदिर चौक, गणपती मंदिर, मशीद, दत्तमंदिर, वर्पे तालीम, लक्ष्मीनगर, मुख्य चौक अशा मार्गाने पथसंचलन केले. पथसंचलनात आळंदी पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, २२ ठाणे अंमलदार, ५० बीएसएफ प्लाटून, पाच अधिकारी, ८२ जवान सहभागी झाले होते.