Search
Close this search box.

पार्किंगमध्ये लघुशंका करणार्‍यांना जाब विचारल्याने मारहाण करुन तीन दात पाडले

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

पुणे : इमारतीच्या पार्किंगमध्ये लघुशंका करणार्‍यांना जाब विचारल्याने चिडुन जाऊन चेहर्‍यावर मारहाण करुन खालच्या जबड्याचे तीन दात पाडले. तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर मारहाण करून फ्रॅक्चर केले. याबाबत ऋषिकेश विजु मोरे (वय २९, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार दगडे, सिद्धांत गायकवाड व साहील गजरमल (सर्व रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भिमाले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पार्किंगच्या एरियामध्ये लघुशंका केली. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारला. या कारणावरुन चिडुन जाऊन त्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. त्यांचे चुलते अरुण रंगनाथ मोरे हे भांडण सोडविण्यासाठी आले असताना त्यांना तिघांनी लाथाबुक्क्यांनी चेहर्‍यावर मारहाण करुन त्यांच्या समोरच्या खालच्या जबड्याचे तीन दात पाडले. तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस हवालदार मोईनवाड तपास करीत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.