<a
पुणे : शहरातील सर्व अवैध धंदे बंद असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले होते. मात्र, आचार संहिता लागू होताच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली. त्यातून शहरात सर्वत्र हातभट्टी दारु विक्री, बेकायदेशीर मटका, जुगारचे अड्डे सर्रासपणे सुरु असल्याचे दिसून आले. दररोज पोलीस अनेक बेकायदा दारु धंदे व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी शहर पोलीस दलाने चार ठिकाणी धाडी टाकून मटका किंग नंदू नाईक याच्यासह अनेकांना अटक करुन लाखो रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवार पेठेतील रौनक बार अँड रेस्टोचे वरील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये खडक पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. मटका किंन नंदू नाईक याच्या सांगण्यावरुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी पैसे देऊन कल्याण, वरळी, मुंबई नावाचे मटका जुगार खेळत असताना चौघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ३
