<a
पुणे : रिक्षाभाडे देण्यासाठी पान टपरीचालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करुन धमकाविले. याबाबत दादा कोंडिबा भालेराव (वय ७५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड), यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ ऊर्फ पिंटु तानाजी कांबळे (रा. सिंहगड रोड), यश सोमनाथ कांबळे, पुजा सोमनाथ कांबळे (सर्व रा. सिंहगड रोड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, चोरी, मारामारी, चॅप्टर केससह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारही करण्यात आले होते. ही घटना फिर्यादी यांच्या पानटपरीजवळ शुक्रवारी साडेसहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पान टपरीमध्ये असताना सोमनाथ कांबळे रिक्षाने आले. त्यांनी रिक्षाभाडे देण्यासाठी फिर्यादीकडे पैसे मागितले. ते पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्या कारणावरुन त्यांनी धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डाव्या कानावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या मुलाने व त्याच्या पत्नीने फिर्यादीस शिवीगाळ करुन बघुन घेण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
