Search
Close this search box.

लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली. त्याचा भाऊ शुभम पसार झाला असून, त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ, रियान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना अटक करण्यात आली. प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाज माध्यमांतून बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात होते. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते. बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला अकोला पोलिसांनी अटक केली होती. कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुमभच्या संपर्कात होते. बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, तसेच शंकरशेठ रस्त्यावरील एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकाविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.