<a
पुणे : शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आदिश सोळंकी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात केएसएल १५०७ व्हॉट्सअॅप ग्रुप व त्याचे अॅडमिन तसेच अज्ञात मोबाईलधारक व बँक खातेधारक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोंढवा परिसरात रविराज कोलोरॅडो येथे राहणार्या योती संत यांना स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास २०० टक्के नफा मिळवून देतो, असे अनोळखी व्यक्तींनी सांगितले. त्यांना ऑनलाइन फाईल पाठवून फोनमध्ये डाऊनलोड व इन्स्टॉल करण्यास सांगितले. बँक ऑफ इंडियाच्या विविध खात्यांवर पैसे जमा करण्यास लावले. तसेच भरघोस नफा मिळत असल्याचे भासवून २३ लाख सहा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात प्रीमियम व्हीआयपी केएसएल ग्रुप या व्हॉट्सअॅप ग्रुपचा प्रतिनिधी चिन्मय रेड्डी नाव सांगणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
