Search
Close this search box.

वाघोलीतील तरुणीला १० लाखांचा तर तरुणाला तीन लाखांचा गंडा

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

पुणे : वाघोलीतील एका तरुणीला १० लाख रुपयांचा तर दुसऱ्या तरुणाला सव्वा तीन लाख रुपयांचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला. कुरियरमध्ये ड्रग्स सापडले असल्याची धमकी देवून तरुणीकडून १० लाख रुपये तर क्रेडिट कार्डद्वारे सव्वा तीन लाख रुपयांची तरुणाची फसवणूक करण्यात आली या दोन्ही प्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत वाघोली येथे येथे राहणाऱ्या २८ तरुणीला फोन करून फेडेक्स कुरिअर मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने इराणला जाणाऱ्या पार्सलमध्ये पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, दोन किलो कपडे, लॅपटॉप, ४५० ग्रॅम ड्रग्स सापडले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेत फिर्याद दाखल झाली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी अधिकाऱ्यांशी फोन जोडून देण्यात आला. दोघांनी स्कायपी व्हिडीओ कॉलद्वारे अधिकारी असल्याचे सांगून तरुणीचे आधारकार्ड व बँकेची सर्व माहिती घेतली. मनी लाँड्रिंगची भीती दाखवत खात्यावर २० लाख ट्रान्स्फर करण्यास सांगितले. तरुणीने १० लाख जमा केल्यानंतर ही आणखी पैसे पाठवण्यास सांगितले. तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली. दुसऱ्या घटनेत क्रेडीट कार्डद्वारे परस्पर व्यवहार करून खात्यातून वेगवेगळे ७ व्यवहार करून ३ लाख १५ हजारांची रक्कम सायबर चोरट्यांनी लंपास केली. वाघोली येथील ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्यावेळी व्यवहार करून रक्कम लंपास करण्यात आली असून तरुणाला सकाळी व्यवहारांची माहिती कळाल्यानंतर क्रेडीट कार्ड कंपनीला कळवून सायबर पोर्टल वर तक्रार करत पोलिसात फिर्याद दिली आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.