Search
Close this search box.

प्रेमसंबंधातून तरुणाचा खुन, दांडेकर पुलावरील घटना

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : प्रेमसंबंधांना विरोध करुन टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारुन त्याचा खून केला. ही घटना दांडेकर पुल येथील सार्वजनिक शौचालयाच्या तिसर्‍या माळ्यावर सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली. कौस्तुभ जयदिप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. वीटभट्टी, दांडेकर पुल) यांनी पर्वती पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ नाईक याचे आरोपीपैकी एकाच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते.
या कारणावरुन आरोपी कौस्तुभवर रागावून होते. कौस्तुभ दांडेकर पुलावर आला असताना सहा जणांनी त्याला गाठले. त्याला मारहाण करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना मारामार्‍या करु नका, असे सांगितले. तेव्हा आरोपी यांनी फिर्यादीना तू आमच्यामध्ये पडु नको, असे म्हणून कौस्तुभ याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.