
गेल्या बारा दिवसापासून अप्पर डेपो पुष्पक स्वीट समोर चेंबर पावसामुळे खराब झाले होते. त्यातून सतत सांड पाणी बाहेर येत होते त्याच्यामुळे येथील नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होत होता व सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती मात्र सतत च्या तक्रारी नंतरही येवलेवाडी क्षत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते यानंतर माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारून तात्काळ काम करण्यास सांगितले. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी सुशील मोहिते व इतर कर्मचारी यांच्यासोबत येऊन त्यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली
