Search
Close this search box.

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या..

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:च्या पोटात चाकू मारुन आत्महत्या केली. पूजा ऊर्फ सोनल विकी कांबळे (वय ३३, रा. नरपतगिरी चौक) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर सोनवणे (वय ५४, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकी शंकर कांबळे (वय ३८, रा. बोलाई खाना, नरपतगिरी चौक) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. ही घटना मंगळवार पेठेत २२ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि विकी हे पती पत्नी असून विकी पुजा हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ करत होता. तसेच वारंवार वाद घालून भांडणे करीत होता. २२ जुलै रोजी रात्री विकी याने पुजाशी वाद घालण्यास सुरुवात केली. पतीच्या या त्रासाला कंटाळून पुजा हिने रागाच्या भरात स्वयंपाकाचा चाकू घेऊन स्वत:च्या पोटात वार करुन घेतले. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यात तिचा मृत्यु झाला. पुजावर अंत्यसंस्कार व अन्य विधी पार पाडल्यानंतर तिच्या आईने तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

मुख्य संपादक : नितीन मधकुर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool