पुणे दि. १८: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ ते ना. पां. (नानासाहेब) करपे चौक, सदाशिव पेठ दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस १५० मीटर अंतरावर पी १, पी २ पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २० जूनपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले
