Search
Close this search box.

बनावट ब्रँडेड कपडे विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ५ लाखांचे बनावट कपडे जप्त

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : दिवाळीच्या सणासुदीत बनावट ब्रँडचे कपडे विक्रेत्यांवर पुणे पोलीस गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामुळे बनावट कपडे विक्री करून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोणीकंद हद्दीतील एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली असून तब्बल ५ लाख रुपयांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करण्यात आला आहे. साई ब्रँड होम, केसनंद <a href="https://maharashtrafastdigitalneफाटा, वाघोली पुणे येथे बनावट ब्रँडचे कपडे विक्री केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दि. २० ऑक्टोबर रोजी एका कंपनीचे प्राधिकृत अधिकारी यांनी याबाबत तक्रार नोंदविली होती. संशयित विक्रेता गौरव सत्यवान नरवाडे, वय २७ वर्षे, रा. वाघोली, तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या साई ब्रँड होम, केसनंद फाटा, वाघोली पुणे येथे कंपनीचे बनावट कॉपीराईट कपडे विक्री होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या आदेशाने सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली असता कपड्याचे दुकानांमधून व त्याचे गोडाऊन मधून एकूण ४,९४,६५०/- रुपये कि. चा कॉपीराईट केलेला बनावट माल (शर्ट ) जप्त करण्यात आला. सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा र.नंबर ९९०/२०२४ कॉपी राईट ॲक्ट १९५७ चे कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे , पो.उप.आयुक्त गुन्हे, निखील पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त, राजेन्द्र मुळीक , पोलिस निरीक्षक, युनिट ४.अजय वाघमारे , पोलीस निरीक्षक युनिट ६ वाहेद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मदन कांबळे, युनिट ६ पो.उप.नी. दिगंबर चव्हाण युनिट ४ व युनिट ६ व ४ कडील अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.