Search
Close this search box.

फर्ग्युसन रस्ता परिसरातील बंगल्यात चंदन चोरी; बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदन चोरी केली होती. चंदन चोरट्यांनी आता थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केल्याने सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आर्यन शिरोळे (वय २३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या शिरोळे रस्त्यावर शिरोळे यांचा शिवराई बंगला आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना बंगल्यातील चंदनाचे झाड कापण्याचा आवाज आला. त्यानंतर ते बंगल्याच्या आवरात आले. तेव्हा तीन ते चार चाेरटे चंदनाचे झाड करवतीने कापत होते. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा करू नका, असे सांगितले. आरडाओरडा केल्यास दगड मारेल, असे सांगितले. त्यानंतर चंदनाचे झाड कापून चोरटे अंधारात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.

पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फर्ग्युसन रस्ता परिसरातील एका बंगल्यात शिरलेल्या बंगला मालकाला दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. दोन महिन्यांपूर्वी प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदन चोरी केली होती. चंदन चोरट्यांनी आता थेट नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केल्याने सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आर्यन शिरोळे (वय २३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असलेल्या शिरोळे रस्त्यावर शिरोळे यांचा शिवराई बंगला आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना बंगल्यातील चंदनाचे झाड कापण्याचा आवाज आला. त्यानंतर ते बंगल्याच्या आवरात आले. तेव्हा तीन ते चार चाेरटे चंदनाचे झाड करवतीने कापत होते. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना दगड भिरकावून मारण्याची धमकी देऊन आरडाओरडा करू नका, असे सांगितले. आरडाओरडा केल्यास दगड मारेल, असे सांगितले. त्यानंतर चंदनाचे झाड कापून चोरटे अंधारात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत

Rahul Waghmare
Author: Rahul Waghmare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.