<a
पुणे : तरुणाने आपल्या नातेवाईक असलेल्या तरुणीला तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे, त्याच्याशी बोलू नको, असे सांगितल्याने त्या तरुणीने बोलणे बंद केले. त्याने खरोखरच आपण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने दाखवून देत तरुणावर हत्याराने वार करुन जबर जखमी केले. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या या तरुणीला व तिच्या बहिणीला मारहाण केली. लखन बाळु मोहिते (वय २१, रा. भिमनगर झोपडी संघ, आवटे वस्ती, वैदुवाडी, हडपसर) याच्यावर वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अभिषेक सतीश सोनवणे (वय २५, रा. भिमनगर झोपडी संघ, वैदुवाडी, हडपसर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाच्या पत्नीची बहिणीची गल्लीतील लखन मोहिते याच्याशी ओळख झाली. ते एकमेकांना मोबाईलवर चॅटींग करुन बोलत होते. हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी लखन मोहिते हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने त्याच्याशी बोलू नको, अशी समज दिली. त्यामुळे तिने लखन मोहिते याच्याशी बोलणे बंद केले. त्याचा आरोपीला राग आला. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फिर्यादी हे रामटेकडी येथील विराज चायनीज समोरुन रोडवरुन जात होते. त्यावेळी लखन याने टोकदार हत्याराने फिर्यादी यांच्या पाठीवर व पोटावर मारुन जखमी केले. वाईट शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादी यांची वहिनी व तिची बहिण फिर्यादी यांना सोडविण्यासाठी मध्ये आल्या असताना आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली. पोलीस अंमलदार राऊत तपास करीत आहेत.
