भोर, तालुक्यातील शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी आणि अशा वर्कर यांनी मंगळवारी पहाटे महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करून नवजात बालिकेश व महिलेला जीवदान दिले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद कांबळे आणि आशा वर्कर मीना चव्हाण यांचे महिलांचे नातेवाईकांनी अभिनंदन केले मंगळवारी पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी 108 क्रमांकावर पेजळवाडी तालुका भोर येथील महिलेस प्रसूतीस घेऊन जाण्यासाठी कॉल आला त्यावेळी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका हे भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात होती रुग्णवाहिकेचे चालक सचिन राऊत यांच्यासह डॉक्टर मिलिंद कांबळे हे 22 किलोमीटरचे अंतर केवळ वीस मिनिटांमध्येच पार करून पेजळवाडी ते पोहोचले तेथून गरोदर महिला काजल रंगनाथ चव्हाण यांना रुग्णवाहिकेमध्ये घेतली आणि रुग्णवाहिका भोगवले तालुका बोर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे निघाले सध्यास्थितीत पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर पाणी चिखल आणि खड्डे होते. भोगावली च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता परंतु महिलेला खूपच तीव्र प्रसुतिवेदना होत असल्यामुळे सहा वाजून 14 मिनिटांनी रुग्णवाहिकेतच डॉक्टरांनी तिची सुखरूप प्रसूती केली. काजल यांनी एका बालिकेला जन्म दिला नवजात बालिका आणि आई आणि दोन्हीही सुरक्षित आहे नागरिकांनी डॉक्टर आणि आशा वर्कर तालुक्याचे अभिनंदन केले..<a
