Search
Close this search box.

पुणे ग्रामीणचे नवे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल— राज्याच्या गृह विभागाकडून अधिकृत आदेश जारी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे | राज्याच्या गृह विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला असून, पुणे जिल्हा ग्रामीणचे नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून संदीपसिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीपसिंह गिल हे एक कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख आणि समाजातील सर्व घटकांमध्ये सहज मिसळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त (DCP Zone 1) म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असून, त्यावेळचा त्यांच्या नेतृत्वातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेवरील प्रभाव सर्वांनी अनुभवलाय.
गिल यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, तत्परता आणि जनतेशी थेट संवाद हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. त्यांच्या नव्या भूमिकेचे संपूर्ण पुणे जिल्ह्यात स्वागत केले जात आहे.
मुख्य संपादक : नितीन वायदंडे

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

Buzz Open / Ai Website / Ai Tool