पुणे (प्रतिनिधी) : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. भरदिवसा रस्त्यावर खुलेआम होणारे हल्ले आणि खुनांच्या घटना पुण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
सदोष उदाहरण म्हणून, पुण्यातील दत्तवाडी परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केलं. हल्लेखोरांच्या हाती कोयते आणि धारदार शस्त्र होते. जीव वाचवण्यासाठी तरुणाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल जाऊन रस्त्यावर पडताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यामागे जुना वाद असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिस आणि प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक : नितीन वायदंडे

