Search
Close this search box.

मेव्हणीच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने इस्टेट एजंटचा खून; चुलत भाऊ आणि पुतण्याला अटक

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे, प्रतिनिधी :
पुण्यातील कात्रज परिसरात शुक्रवारी रात्री इस्टेट एजंटचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मेव्हणीच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे झालेल्या वादातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे.
मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, गुजरवाडी रोड, मांगडेवाडी, कात्रज) असे आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघे रा. खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रोहित हा मृताच्या मेव्हणीचा चुलत भाऊ असून दोघेही आरोपी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर शिंदे यांच्या मेव्हणीचे रोहित असोरे याच्याशी अनैतिक संबंध होते. रोहित पूर्वी रिक्षाचालक होता आणि सध्या टुरिस्ट वाहन व्यवसाय करतो. मनोहर यांनी या संबंधांना विरोध दर्शविल्याने त्यांच्या आणि रोहित यांच्यात अनेकदा वाद झाले होते.
शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास रोहितने आपल्या दोन-तीन मित्रांसह मनोहर शिंदे यांना पवारनगर येथील ज्ञानदा अपार्टमेंटसमोर अडवले. त्याठिकाणी त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी आणि बांबूने अमानुष मारहाण करण्यात आली. डोक्यावर गंभीर इजा झाल्याने मनोहर शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ दोन शोधपथके रवाना करून मुख्य आरोपी रोहितला पुण्यातून आणि केशवला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू
मुख्य संपादक : नितीन वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

Buzz4 Ai