आपल्या कार्य क्षेत्रातीमध्ये दारू धंदा व मटका धंदे चालू आहे यामुळे आपल्या कार्य क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्यामुळे परिसरात शांतता धोक्यात आली आहे , परिसरात नागरिकांनी अनेक वेळा आपणास निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन काही दिवस हे दारू धंदे व मटका धंदे बंद राहिले परंतु आता नव्या जोमाने पुन्हा दारू धंदे व मटका धंदे सुरू झाले असून अनेक शालेय विद्यार्थी, मोल मजुरी करणारे कष्टकरी शेतकरी व तरुण वर्ग या दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे त्यामुळे अनेक प्रपंच उध्वस्त होण्याची शक्यता आहे. तरी आपण तातडीने आपल्या कार्य क्षेत्रातील मधील अवैध दारू धंदे बंद व मटका धंदे बंद करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडून मुरुड पोलीस ठाणे समोर उपोषणास बसावे लागेल तरी आपणास विनंती कि आमच्या अर्जाचा विचार करून आपल्या कार्य क्षेत्रातील मधील अवैध दारू धंदे व मटका धंदे बंद ही निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली.
यावेळी उपस्थित
#विजय दादा दणके, #अनिकेत भाऊ हजारे, #विक्रम भैया सोनकांबळे, #कुणाल भाऊ चव्हाण, सचिन भाऊ हजारे, संकेत भाऊ हजारे, विजय भाऊ पाटोळे, पियुष थोरात.
