नांदेड येथे झालेल्या शालेय वूशू स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून कमलेश विजय सकट याची येणाऱ्या राष्ट्रीय(National) वूशू स्पर्धेमध्ये निवड.<a
क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय वूशू क्रीडा स्पर्धा २०२४-२५ या जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे दिनांक २५ ते २७ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये रॉयल स्पोर्ट अकॅडमीचे व पृथ्वीराज कपूर जुनिअर कॉलेज , कन्या प्रशाला व साने गुरुजी स्कूल चे विद्यार्थी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून कदम वाकवस्ती गावचे व लोणी काळभोर गावचे नांदेड येथे नावलौकिक केले आहे.
पृथ्वीराज कपूर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज चा
कमलेश विजय सकट : प्रथम ( Gold medal )
व
मोहिनी व्यंकटी धनगरे : द्वितीय ( silver medal )
कन्या प्रशाला
सिद्धी अविनाश काळभोर : ( Bronz medal )
साने गुरुजी हायस्कूल हड़पसर
रुद्राक्ष वाघेश्वर पाटिल : द्वितीय( Silver medal )
कमलेश विजय सकट याची नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय(National) वूशू स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. हे खेळाडू सूरज उकिरडे सरांच्या मार्गदर्शना ख़ाली सातत्यानी अनेक स्पर्धत भाग घेऊन यशाची ऊंची गाठत आहेत. हे सर्व 5% आरक्षित खेळामधून पुढील भविष्यातील कारकीर्द निर्धारित करत आहेत .याबद्दल सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा …..
