Search
Close this search box.

वडकी ग्रामसेवकांनी अरेरावीची भाषा करुन शिवीगाळ केल्याचा आरोप; फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<

पुणे : माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीची मूळ पत्र मागण्यासाठी गेल्यानंतर वडकी (ता. हवेली) ग्रामसेवकांनी अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली आहे. असा आरोप एकाने केला असून याप्रकरणी त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. जितेंद्र शिवाजी आंबेकर (रा. वडकी, ता. हवेली) यांनी ग्रामसेवक माधव सुखदेव वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर १३७७ मधील जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसताना ही नोंद ग्रामसेवक माधव वाघ यांनी मंजूर केली होती. व नोंद मंजूर झालेल्या व्यक्तीने त्या जागेवरून सुमारे दीड कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले आहे. या नोंदीमध्ये खूप मोठा भष्टाचार झाला आहे. असा आरोप करून जितेंद्र आंबेकर यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत आपले सरकार केंद्रावरून अर्ज भरून माहिती मागितली होती. त्यानंतर ग्रामसेवक माधव वाघ यांनी सदर नोंद ही माझ्या कार्यकाळात झालेली नव्हती. अशी माहिती आपले सरकार केंद्रावर पीडीएफ स्वरुपात मिळाली होती. या माहितीची मूळ पत्र घेण्यासाठी जितेंद्र आंबेकर वडकी ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता. २२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गेले होते. या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, जितेंद्र आंबेकर यांनी ग्रामसेवक माधव वाघ सदर माहितीची मूळ प्रत मागितली असता, ग्रामसेवक माधव वाघ यांनी अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली आहे. असा आरोप जितेंद्र आंबेकर यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.