चाकूर : – एक दिवस मांगासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी ही शपथ घेऊन लहुश्री विष्णूभाऊ कसबे साहेब यांनी अडीच दशकापुर्वी स्थापीत केलेल्या लहुजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेची लातूर जिल्ह्यातील चाकूरची जम्बो कार्यकारणी नुकतीच गठीत करून नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा पदानियुक्तीपत्र प्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला.
🔥 चाकुर शहरातील साई नंदनवन परिसरात संघटनेचे प्रवक्ते मा.प्रा.दयानंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभात संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा.मायाताई लोंढे लातूर जिल्हाध्यक्ष मा.बापुसाहेब मगर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मा.महानंदा वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
🔥 या समारंभाचे प्रास्ताविक ‘ लसाकम ‘ चे जिल्हा सरचिटणीस मा.धनराज सुर्यवंशी यांनी केले सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संतराम मोठेराव यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार नगरसेवक मा.रामभाऊ कसबे यांनी मानले.
🔸 यावेळी सर्वश्री चाकूर तालूकाध्यक्ष रामजी मोठेराव गंगाराम गोणे राजाराम दुवे राजू लोंढे तानाजी भालेराव दिवाकर मोठेराव संपत वाघमारे गंगाधर मोगले इश्वर गुळवे चंद्रकांत मोगले लताताई लांडगे माधव कलवले बालाजी वाघमारे अजय देवकांबळे देवानंद गोणे विजय भालेराव अजय कोलेवाड अर्जुन गायकवाड सचीन गायकवाड महेश खलसे लखन मोठेराव राम समुकराव भास्कर वाघमारे राजू कोलेवाड आकाश कोलेवाड संजय नाईकवाडे माधव कलवले केशव कांबळे तातेराव सुर्यवंशी आदीसह चाकूर विभागातील मातंग समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍👍👍🌹🌹🌹
